Pune : संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

The city's water supply will be closed on Thursday

एमपीसी न्यूज – पंपिंग आणि तातडीची देखभाल दुरुस्ती विषयक कामे करण्यात येणार असल्याने संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी (दि. 11 जून) पाणी येणार नाही. तर, शुक्रवारी ( दि. 12 जून) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

पर्वती, वडगांव, लष्कर, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग येथील विद्युत विषयक, तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार नाही. तर, शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, कर्वे रस्ता, एसएनडिटी परिसर, कोथरूड, कर्वेनगर, कोंढवा खुर्द, हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, कोंढवा बुद्रुक, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, गोखलेनगर, जनवाडी, बावधन, बाणेर, चांदनी चौक, वारजे हायवे परिसर, वारजे – माळवाडी, अहिरेगाव, सुस, सुतारवाडी, भुगाव रोड, लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरोगाव पार्क, तडीवाला रस्ता, वानवडी, कोंढवा, हडपसर, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, सोलापूर रस्ता, कळस, धानोरी, लोहगाव, विमाननगर, नगर रस्ता परिसरात पाणी येणार नाही. त्यासाठी पुणेकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.