Pune : ‘कोरोना’च्या भीतीमुळे रस्ते पडले ओस’; ‘पीएमपीएमएल’लाही मिळेनात प्रवासी

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’च्या भीतीमुळे पुण्यातील सर्वच रस्ते सध्या ओस पडले आहे. गरज असेल तर बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‘कोरोना’चा फटका ‘पीएमपीएमएल’लाही बसला आहे.

बसेसमध्ये गर्दी होत असल्याने आपल्या जीवाला धोका नको म्हणून सर्वसामान्य पुणेकर घरी राहण्यास प्राधान्य देत आहे. महापालिकेतर्फे सर्व उद्याने बंद ठेवण्यात आली आहेत. शाळा, सिनेमागृहही बंद असल्याने एक प्रकारे अघोषित संचारबंदी असल्याचे वातावरण आहे. दुसरीकडे पुण्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढच होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

पुणे महापालिका आणि जिल्हा प्रशासन सध्या विविध उपाययोजना करण्यावर भर देत आहे. कोरोनाचे रुग्ण आता 15 झाल्याने त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.