Pune : कोरोना पेशंटला बेड मिळालाचं पाहिजे; पुणे महापालिकेत मनसेचे अनोखे आंदोलन

The corona patient should get a bed; Unique agitation of MNS in Pune Municipal Corporation : शहरात covid-19 रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच त्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नाही.

एमपीसीन्यूज : शहरात covid-19 रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच त्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नाही.  covid-19च्या रुग्णांला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही ही बाब महापालिका प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर हॉस्पिटलमधील बेड टाकून झोपून आंदोलन केले. यावेळी त्यांनी कोरोना रुग्णाला बेड मिळालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या.

महापालिकेच्या मुख्य इमारतीत अशाप्रकारचे आंदोलन आणि घोषणाबाजी होत असल्याचे पाहून यावेळी बघ्यांची गर्दी निर्माण झाली होती.

दरम्यान, या आंदोलनाविषयी माहिती देताना वसंत मोरे म्हणाले, महापालिका प्रशासनाने आतापर्यंत covid-19 साठी दोनशे कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे.

200 कोटी रुपये खर्च केले तर अजूनही रुग्णांना बेड का मिळत नाही?. शहरातील रुग्णांना बेड मिळून द्या; अन्यथा याहीपेक्षा तीव्र पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा मोरे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.