Pune : मुलांना देखील आता सायकलचे वाटप करा – शरद पवार

एमपीसी न्यूज – आतापर्यंत मुलींना सायकल दिल्या आहेत. याचा मला एका मुलीचा बाप असल्याने आनंद वाटतो.

तर आजअखेर मुलींना 25 हजार सायकलचे वाटप करण्यात आले. पण, मुलांना सायकल दिल्या नाही. ही माझी तक्रार असून यात बदल करुन पुढच्या वर्षी मुलांना देखील सायकल देण्यात याव्यात, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यक्रमा दरम्यान सूचना केल्या.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील 6 हजार मुलींना सायकलचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
