Pune : भाजपसाठी ही धोक्याची घंटा – खासदार संजय काकडे

एमपीसी न्यूज – भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजपला खडे बोल सुनावले.खासदार संजय काकडे यांनी मध्य प्रदेश, राजस्थान, आणि छत्तीसगड या राज्यांत जाऊन त्यांचा वैयक्तिक सर्वे केला . या सर्व्हेच्या निकालानंतर काकडे यांनी पुन्हा एकदा भविष्यवाणी केली.

राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत भाजपची सत्ता जाणार , हे ठाऊक होतं मात्र मध्य प्रदेशमधेही सत्ता जात असेल तर ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे असे स्पष्ट मत मांडले.या राज्यांत लोकसभेच्या 65 जागा असल्याने भाजपसाठी ही धोक्याची घंटा असल्याचेही त्यांनी म्हटलंय .मोदी आणि शहा यांनी मंदिर – मशीद, नामांतर या सारख्या विषयांना बाजूला ठेवून विकासावर भर दिला पाहिजे असा सल्ला देत , जरी मध्य प्रदेशमधे भाजपला काठावर सत्ता मिळाली तरी ती भाजपची हारच असेल असे परखड मत मांडले आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.