BNR-HDR-TOP-Mobile

Pune : इलेक्ट्रिक खांबाचा शॉक लागून मुलीचा मृत्यू, महावितरणच्या दोघांवर गुन्हा दाखल

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज- अंगणात खेळत असलेल्या 11 वर्षीय मुलीला इलेक्ट्रिक खांबाचा शॉक लागून तिचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील जनता वसाहत येथील गल्ली क्रमांक 18 मध्ये सोमवारी ही घटना घडली. दत्तवाडी पोलिसांनी याप्रकरणी कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. 
गौरी अशोक शिळीमकर (वय-11) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. गौरी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अंगणात  खेळत होती. खेळता खेळता तिने खांबाला हात लावला आणि शॉक लागल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अशोक शिळीमकर यांनी फिर्याद दिली आहे.
  • महावितरणचे सेक्शन इंजिनिअर आणि लाईनमन यांनी इलेक्ट्रिक खांबाची रेग्युलर तपासणी न केल्यामुळे आणि इलेक्ट्रिक खांबाकडे दुर्लक्ष करून कामात हलगर्जीपणा केल्यामुळे खांबात वीजप्रवाह उतरून मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस  निरीक्षक केचे करीत आहेत.
HB_POST_END_FTR-A4

.