Pune : महापालिका आयुक्तांची बदली करण्याचा निर्णय चुकीचा – गिरीश बापट

The decision to transfer the Municipal Commissioner is wrong - Girish Bapat लॉकडाऊनचा निर्णय अजित पवार यांनी एकतर्फी घेतला आहे.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्याचा निर्णय चुकीचा असून त्यांना सरकारने बळीचा बकरा बनवले. गेल्या काही महिन्यांत  कोरोना संक्रमण रोखण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना असे अचानक बदलणे योग्य नाही, अशा शब्दांत खासदार गिरीश बापट यांनी नाराजी व्यक्त केली. 

सरकार कोरोनाचे राजकारण करू नका असे एकीकडे सांगत असताना, असे निर्णय राजकीय अभिनिवेशातून घेतले आहेत काय अशी शंका यायला लागली आहे. पुणे मनपात भाजपाची सत्ता असल्याने असे धरसोडीचे राजकारण राज्य सरकार करू लागले. आधी अचानक लाॅकडाऊन आणि आता प्रमुख अधिकाऱ्यांची बदली, ही चुकीची गोष्ट करण्याची मालिका आहे. मी याचा तीव्र निषेध करतो, असेही बापट म्हणाले.

लॉकडाऊनचा निर्णय अजित पवार यांनी एकतर्फी घेतला आहे. त्यासाठी कोणत्याही आमदार, खासदारांना विचारात घेतले नाही. केवळ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याबाबत आम्ही नाराजी व्यक्त करीत आहे. लॉकडाऊनला सहकार्य करू, पण असे निर्णयाचा पुनर्विचार झाला पाहिजे. अनेक लोकांना आता रोजगार नाहीत, त्यांच्या घरांत औषधालाही पैसे नाहीत.

राज्य सरकारने अजून पॅकेज जाहीर केले नाही. लॉकडाऊन हा सर्वातपरि निर्णय नाही, टेस्टीग वाढली पाहीजेत. केलय ते चांगले केले नाही. आमचं लॉकडाऊनला सहकार्य असेल, पण असे एकतर्फी निर्णय घेतले तर आम्ही विचार करू, असा इशाराही बापट यांनी दिला. 3 टक्के नागरिक बेशिस्त वागतात, म्हणून 97 टक्के पुणेकरांना त्याची शिक्षा देणे बरोबर नाही, असा हल्लाबोलही अजित पवार यांच्यावर करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.