Pune : स्मार्ट सिटीतर्फे ‘संयम अ‍ॅप्लिकेशन’ विकसित

एमपीसी न्यूज – ‘संयम’ हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन पुणे स्मार्ट सिटीतर्फे विकसित करण्यात आले असून, त्याद्वारे शासकीय विलगीकरण केंद्र तसेच घरी क्वारंटाईन केलेल्या लोकांना ऑनलाइन साह्य देण्यात येत आहे.

विलगीकरण केंद्रांवर ठेवलेल्या लोकांना स्मार्ट सिटीने नि:शुल्क वायफाय सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. व्हीएमडी स्क्रीन, सोशल मीडिया आणि वेबसाइटवर सोशल मेसेजिंगद्वारे जनजागृती मोहीम राबविली जात आहे. नागरिकांना https://www.pmc.gov.in/en/corona या लिंकवर अद्ययावत माहिती दिली जाते.

एका क्लिकवर विविध कामांचा आढावा घेण्याकरिता स्मार्ट सिटी कमांड सेंटरकडे प्रगत तंत्रज्ञान आहे, त्यामुळे त्यात आवश्यक बदल करून करोनाविरूद्धच्या लढाईत या तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग होत आहे.

व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले स्क्रीन, सार्वजनिक घोषणा प्रणाली, आपत्कालीन कॉल बॉक्स, स्ट्रीटलाईटिंगसह अशा विविध विविध स्मार्ट इलेमेंट्स व कामांची देखरेख करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीने 3 वर्षांपूर्वी कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारले होते.

करोना विषाणूची आपत्ती शहरात आल्याने याकामी कमांड सेंटरचा प्रभावी वापर करत आहोत, असे पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.