Pune : टिंबर मार्केटपाठोपाठ मार्केटयार्ड येथे ही आग्नीतांडव, गोडाऊन जळून खाक

एमपीसी न्यूज – पुण्यात आगीचे सत्र कायम असून टिंबर मार्केट(Pune) पाठोपाठ आता मार्केटयार्ड येथेही मोठे अग्नी तांडव झाले. ही आग रविवारी (दि.28) मध्यरात्री लागली. या आगीत गोडाऊन व गोडाऊनमध्ये असलेले दोन टेम्पो जळून खाक झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

 

आगीची वर्दि मिळताच घटनास्थळी अग्नीशमनदल दाखल झाले. घटनास्थळी पोहचताच जवानांनी पाहिले की, या ठिकाणी अंदाजे 5 हजार स्क्वे.फुटच्या  एका गोडाऊनमधे कागद रद्दी व काही प्रमाणात पुठ्ठा असणाऱ्या मालाला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. जवानांनी तातडीने गोडाऊनच्या मुख्य दरवाजाचे बोल्ड कटरच्या सहाय्याने कुलुप तोडत चोहोबाजूंनी पाण्याचा मारा सुरू करून आतमधे कोणी कामगार अथवा नागरिक अडकला नाही ना याची  खात्री करत कारवाईला सुरुवात केली.

Pune : जादा परतावा मिळेल सांगून 24 जणांची फसवणूक

आग मोठी असल्याने जवानांनी अतिरिक्त मदत अग्निशमन वाहनांना पाचारण केले. शेजारीच रहिवासी इमारत असल्याने आग त्या दिशेला पसरु नये याची विशेष खबरदारी घेत पाण्याचा मारा सुरू ठेवत सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणली. यावेळी गोडाऊनमध्ये असलेले रद्दी चे कागद पुर्णपणे जळाले. घटनास्थळी गोडाऊनमधे असलेले दोन टेम्पो ही जळाले. नुकसान व आगीचे कारण समजू शकले नाही. ही कारवाई सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

मात्र या आगीच्या सत्रानंतर पुण्यातील मार्केट परिसरातील आग नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थीत झाले असून प्रशासन याला कधी गंर्भीतेने पहाणार असा प्रश्न उपस्थित झाला (Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.