Pune : 27 मे रोजी होणार स्वराज्य संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन

एमपीसी न्यूज : स्वराज्य संघटनेचे (Pune) संस्थापक अध्यक्ष माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे राज्यभरात दौरे सुरू आहेत. त्या दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात 27 मे रोजी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे स्वराज्य संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. अशी माहिती स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपाध्यक्ष रघुनाथ चित्रे पाटील, प्रशांत पाटणे, गणेश सोनवणे, रेश्मा गोसावी, निखील काची उपस्थित होते. यावेळी धनंजय जाधव म्हणाले की, स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेचे राज्य मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन शिवाजीनगर येथे 27 मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता होणार आहे. हे कार्यालय प्रशस्त असून कार्यालयात पत्रकार परिषद, छोटे मेळावे, शिबीर, बैठका घेण्यासाठी छोटेखानी सभागृह करण्यात आले आहे.
तसेच स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचे विशेष (Pune) दालन असून महिन्यातील ठराविक दिवशी राज्यभरातील नागरिकांना या ठिकाणी संभाजीराजे यांना भेटता येणार आहे. तसेच या कार्यालयात सुसज्ज अशी वॉर रूम देखील साकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Pune Crime : आयपीएलवर सट्टा लावणारी टोळी जेरबंद
तसेच ते पुढे म्हणाले की, मध्यवर्ती कार्यालयाच्या उदघाटनानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. हे अधिवेशन सर्व कार्यकर्त्यांना खुले असणार असल्याचे त्यांनी सांगितले.