Pune : शहरात ‘कोरोना’ विषाणूचे आढळले पाच रुग्ण!; पुणे विभागात एकूण संख्या 77

एमपीसी न्यूज – पुणे शहरामध्ये बुधवारी (दि. 1 एप्रिल) कोरोनाचे 5 रुग्ण आढळले. पुणे विभागातील एकुण रुग्ण संख्या 77 झाली आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे 36, पिंपरी चिंचवड 12, सातारा 2, सांगली 25 आणि कोल्हापूर 2 असे 77 कोरोनाचे रुग्ण आहेत. तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 1633 होते. त्यापैकी 1529 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 104 चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवाला पैकी 1413 नमुने निगेटीव्ह आहेत व 77 नमुने पॉझिटीव्ह आहेत.

आतापर्यंत 16 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. विभागामधील 7795 प्रवाशापैकी 4276 प्रवाशांबाबत फ़ॉलोअप सुरू असून 3519 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे.

आजपर्यंत 1001140 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4591191 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 382 व्यक्तीना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.