Pune : शनिवारवाडा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

The flag will be hoisted by the District Collector at Shaniwarwada

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापनदिन समारंभानिमित्त शनिवारी (दि. 15 ऑगस्ट) सकाळी 7.30 वाजता नुतन जिल्हाधिकारी कार्यालयात आणि शनिवारवाडा येथे सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पत्रकाद्वारे दिली.

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते विधानभवन (कौन्सिल हॉल) पुणे येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहून उत्साहाने समारंभ साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य शासकीय समारंभात भाग घेता यावा, यासाठी शनिवारी (दि. 15 ऑगस्ट) सकाळी 8.35 ते 9.35 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय व निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये.

जर एखाद्या कार्यालयास असा समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी त्या दिवशी सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 नंतर करावयाचा आहे.

ध्वजारोहण कार्यक्रमास हजर राहणा-या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोशाखात यायचे आहे. उपस्थितांनी योग्य त्या पध्दतीने राष्ट्रध्वजास सलामी द्यावी आणि इतरांनी दक्षतेने ओळीत उभे रहावे.

कोरोना विषाणूची पार्श्वभूमी लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात मर्यादा येणार असून स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील तसेच कोरोना योध्दे (डॉक्टर्स, सफाई कामगार, आरोग्य सेवक) यांच्यासह या आजारांवर मात केलेल्या काही नागरिकांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी मास्क बंधनकारक असून सामाजिक अंतर राखायचे आल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.