Pune : महापालिकेत ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा ; सुमारे 300 ठेकेदारांची बिले सादर करण्यासाठी गर्दी

Pune: The fuss of 'social distance' in the Municipal Corporation; Crowds to submit bills of about 300 contractors

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना महापालिकेत सोशल डिस्टन्सिंगचा शुक्रवारी फज्जा उडाला. सायंकाळी सुमारे 200 ते 300 ठेकेदारांनी बिले सादर करण्यासाठी एकाच वेळी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

एकीकडे महापालिकेचे अधिकारी – कर्मचारी कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस जीव ओतून काम करीत आहेत. तर, दुसरीकडे  अशा प्रकारे ठेकेदारांनी खुद्द महापालिकेतच गर्दी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  तसेच या ठेकेदारांना कोरोनाचे काही गांभीर्य आहे की नाही, असा सवाल निर्माण झाला आहे.

पुणे महापालिकेची मागील वर्षीची बिले सादर करण्यासाठी लेखापाल विभागात एकाच वेळी 200 ते 300 ठेकेदारांनी सायंकाळी गर्दी केली. बिले सादर करण्यासाठी आज (शुक्रवार) शेवटचा दिवस होता. अशा प्रकारचे निरोप महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले होते.

ही गर्दी झाल्याचे सभागृह नेते धीरज घाटे यांना समजताच त्यांनी महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांना दूरध्वनी केला.आणि ठेकेदारांच्या फाईल घेऊन गर्दी कमी करा, अशी मागणी केली.

त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या ठेकेदारांना बाजूला केले. आणि गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, प्रशासन अतिशय ढिम्म गतीने काम करीत आहे. बिले सादर जारण्याचा आज शेवटचा दिवस होता तर टप्प्याटप्प्याने या ठेकेदारांना बोलवायला पाहिजे होते.

कोरोना सारखे भयंकर संकट शहरात असताना ठेकेदारांची एवढी  गर्दी प्रशासनाने का होऊ दिली? असा संतप्त सवाल महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी उपस्थित केला.

वॉर्डस्तरावरील ठेकेदारांना तिथल्या तिथेच बोलवायला पाहिजे होते. त्यांना महापालिकेत कशाला बोलावले. 15 वॉर्ड ऑफिसच्या ठेकेदारांनी आज मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवाय पुणे महापालिकेच्या मुख्य खात्याच्या ठेकेदारांनीही बिले सादर करण्यासाठी गर्दी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like