BNR-HDR-TOP-Mobile

Pune : गणेशोत्सवात आणखी दोन दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक वापरास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

गणेशोत्सवात एकूण सहा दिवस रात्री बारापर्यंत वाजणार डीजे

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवात चार दिवस सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक (डीजे) वाजवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यात विशेष बाब म्हणून जिल्हाधिका-यांनी आणखी दोन दिवस डीजे रात्री बारापर्यंत वाजवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमान्वये डीजे वापराच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार श्रोतृगृहे, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांव्यतिरिक्त निवडक ठिकाणी सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत डीजे वाजवण्यासाठी वर्षभरात केवळ 15 दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिका-यांनी वर्षभरातील विविध सणांसाठी 13 दिवस निश्चित केले आहेत. तर दोन दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत.

राखीव ठेवलेले दोन दिवस गणेशोत्सवासाठी देण्यात आले आहे. शेवटच्या चार दिवसांमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यात गणपती व आरास पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे विशेष बाब म्हणून ही परवानगी देण्यात आली आहे.

गणेशोत्सवात सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत डीजे वापरासाठी परवानगी असलेले दिवस -:
# शनिवार (दि. 7) – सहावा दिवस
# रविवार (दि. 8) – सातवा दिवस
# सोमवार (दि. 9) – आठवा दिवस
# मंगळवार (दि. 10) – नववा दिवस (राखीव दिवस)
# बुधवार (दि. 11) – दहावा दिवस (राखीव दिवस)
# गुरुवार (दि. 12) – अकरावा दिवस

HB_POST_END_FTR-A2

.