Pune : विधान भवनातील शासकीय ध्वजारोहण होणार राज्यपालांच्या हस्ते

राज्यपालांचे पुण्यात आगमन झाले आहे. : The government flag will be hoisted at the Vidhan Bhavan by the Governor

एमपीसी न्यूज – पुणे येथील विधान भवनात होणारे शासकीय ध्वजारोहण यावर्षी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांचे पुण्यात आगमन झाले आहे.

विधान भवन येथे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते.

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्याच्या विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.