Pune : महापालिका प्रत्यक्ष सभेबाबत शासनाचे अद्याप उत्तर नाही

येत्या 5 ऑगस्ट रोजी होणारी सभाही ऑनलाइन होण्याची शक्यता आहे. : The government has not yet given an answer regarding the actual meeting of the corporation

एमपीसी न्यूज – पुणे शहारत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने या विषयावर सर्वोपक्षीय नगरसेवकांना चर्चा करायची आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष सभा घेण्याची विनंती राज्य शासनाला पत्र पाठवून करण्यात आली होती. मात्र, त्याला अद्यापही उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे येत्या 5 ऑगस्ट रोजी होणारी सभाही ऑनलाइन होण्याची शक्यता आहे.

महापालिकेची जुलै महिन्यात ऑनलाइन सभा घेण्यात आली. त्यावेळी विरोधी पक्षांचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सर्वांना बोलू दिले जाणार असल्याचे आश्वासन दिले होते.

पुणे महापालिकेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 300 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, तरीही कोरोना काही आटोक्यात आला नाही. मग नेमका खर्च तरी कशावर केला, असा प्रश्न विरोधी पक्षांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे.

दि. 23 आणि 24 मार्च रोजी महापालिकेची मुख्य सभा झाली. लॉकडाऊनमुळे केवळ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एप्रिल, मे व जूनच्या मुख्य सभा घेण्यात आल्या.

जुलै महिन्याची सभा ऑनलाइन घेण्यात आली. तातडीने या सभा तहकूब करण्यात आल्या. या सभेत नगरसेवकांना बोलू दिले जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

तर, पुणे शहरात कोरोनाचे आता तब्बल 57 हजार 523 रुग्ण झाले आहेत. 38 हजार नागरिकांनी वेळेवर उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

शहरात 18 हजार 40 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत या रोगामुळे 1 हजार 366 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना 1 – 1 बेड्ससाठी खाजगी रुग्णालयात गर्दी होत आहे.

नगरसेवकांना रात्रंदिवस कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचे सातत्याने फोन सुरू असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.