Pune : बचत गटाच्या महिलांसाठी ‘फिक्की फ्लो’कडून ‘घरोबार’चे व्यासपीठ

एमपीसी न्यूज – ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे, बचत गटातील महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशन अर्थात ‘फिक्की फ्लो’ संस्थेच्या वतीने ‘घरोबार डॉट कॉम’चे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

एनआयबीएम-कोंढवा रस्त्यावरील द रॉयल हेरिटेज मॉलमध्ये असलेल्या या ‘घरोबार’मध्ये ग्रामीण भागातील महिला उद्योजिका, बचत गट, विशेष मुले यांनी तयार केलेल्या वस्तूंना प्राधान्य दिले जाणार आहे.’फिक्की फ्लो’च्या अध्यक्षा रितू प्रकाश छाब्रिया यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने स्वयम या कार्यक्रमांतर्गत सुरु करण्यात आलेल्या या वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच झाले. ‘फिक्की फ्लो’च्या उपाध्यक्षा उषा पुनावाला, सदस्या अनिता सणस, ‘घरोबार’च्या संचालिका रश्मी माहेश्वरी, अवनी श्रॉफ, बचत गटाच्या समन्वयिका वैशाली राणे, उदयोजिका धनश्री लाड यावेळी उपस्थित होत्या.

यामध्ये सिल्कपासून तयार केलेल्या विविध आकारातील पर्स, पाऊच, आकर्षक कापडी फाईल फोल्डर, कुशन कव्हर, भेटकार्ड, सौदर्य प्रसाधने, गळ्यात-कानात परिधान करायच्या ज्वेलरी, बॅग अशा ग्रामीण तसेच पारंपरिक शैलीचे दर्शन घडविणाऱ्या वस्तू येथे मांडण्यात आल्या आहेत.

बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासह समाजातील विविध घटकामध्ये उद्योजक वृत्ती निर्माण करून रोजगार निमिर्ती करण्याच्या हा कार्यक्रम राबविण्या येत आहे. येत्या काळात डीमार्ट तसेच रिलायन्ससोबतही अशी भागीदारी करून महिलांच्या सक्षमीकरणाचे काम केले जाणार आहे.

निरनिराळ्या बचत गटांबरोबर व विशेष विद्यार्थ्यासोबत काम करण्याऱ्या वैशाली राणे आणि ग्रामीण भागातील महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करणाऱ्या धनश्री लाड यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम नक्की यशस्वी होईल, असे अनिता सणस यांनी सांगितले.

वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, विशेष विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्था आशा विविध संस्थासोबत संपर्क साधत त्यांनी तयार केलेल्या वस्तु शहरातील नागरिकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करत असतो. या उत्पादकांसाठी कार्यशाळा आयोजित करत त्यांना प्रशिक्षणही देण्यात येते, असे उषा पुनावाला यांनी नमूद केले. पूजा चड्डा यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.