Pune : अद्यापही पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरुच

एमपीसी न्यूज – गुरुवारपासून सुरू झालेली पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक अजूनही सुरुच आहे. 20 तास उलटून गेले तरी देखील गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं नाही. सध्या सार्वजनिक गणपती मंडळाची मिरवणूक अलका टॉकीजच्या पुढे ढकलण्यात आली आहे.

Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीचे काल रात्री 8.50 ला पांचाळेश्वर घाट येथे झाले विसर्जन

काल सकाळी 10 वाजता पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला झाली होती .मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन पूर्ण झाले आहे.शहरातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्त्यावरून अद्याप ही गणपती मंडळांच्या मोठ्या रांगा (Pune) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.