Pune : पुणे विभागात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 72.8 टक्के

विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 5 हजार 449 झाली आहे. त्यातील 1 लाख 49 हजार 551 कोरोना बाधित रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे विभागात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. विभागातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 72.8 टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 5 हजार 449 झाली आहे. त्यातील 1 लाख 49 हजार 551 कोरोना बाधित रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत.

सध्या 50 हजार 352 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधीत 5 हजार 546 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

मंगळवारी (दि. 25) रात्री नऊ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकूण 9 लाख 60 हजार 132 नमुन्यांचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 5 हजार 449 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला आहे.

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 501 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 505, सातारा जिल्ह्यात 496, सोलापूर जिल्ह्यात 350, सांगली जिल्ह्यात 271 तर कोल्हापूर जिल्ह्यात 879 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 49 हजार 897 रुग्णांपैकी 1 लाख 15 हजार 378 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 30 हजार 917 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 602 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.40 टक्के इतके आहे. तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.97 टक्के आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 653 रुग्णांपैकी 6 हजार 165 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 164 आहे. कोरोनाबाधित एकूण 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 16 हजार 409 रुग्णांपैकी 11 हजार 891 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 832 आहे. कोरोनाबाधित एकूण 686 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 8 हजार 886 रुग्णांपैकी 4 हजार 910 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 631 आहे. कोरोनाबाधित एकूण 345 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 19 हजार 604 रुग्णांपैकी 11 हजार 207 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 808 आहे. कोरोनाबाधित एकूण 589 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.