Pune : शहरात डासांचा प्रादुर्भावही वाढतोय

एमपीसीन्यूज  – उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना कोरोना साथीच्या भीतीने ग्रासले असतानाच आता डासांनीही भंडावून सोडले आहे.

उन्हाळ्याच्या सुमारास डासांची वाढ होते. यंदाही ती आहेच. डासांना नियंत्रणात ठेवण्यासाठीची वेगवेगळ्या कंपन्यांची लिक्विड फॉर्ममधील औषधे, मट्स, रॅकेट्स, ओडोमॉस वगैरे बाजारात उपलब्ध आहेत. लोकं ते सगळं खरेदी करत आहेत.

पण केवळ मानसिक समाधानापलिकडे त्यांचा काही उपयोग होत नाही. कंपन्यांचा धंदा खूप होतो. मात्र, डास यातील कशालाच दाद देत नाहीत. डासांच्या त्रासाच्या बरोबरीनेच कोरोना साथीच्या भीतीची लहरही सगळीकडे पसरली आहे.

महापालिका कर्मचारी स्वच्छतेच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने, तसेच कामांच्या तुलनेत त्यांची संख्या मर्यादित असल्याने डास निर्मुलनासाठी सर्वत्र होणारी औषधे फवारणी मोहीम बंद आहे.

डास चावल्याने सर्दी, खोकला, ताप हे आजार वाढले आहेत. त्यातच आता काही औषधेही मिळत नाहीत. त्यामुळे लोकं अगदी त्रासले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.