Pune : भारतीय सैन्य या हल्ल्याला चोख उत्तर देईल – ब्रिगेडियर हेमंत महाजन

एमपीसी न्यूज – गुप्तहेर माहितीच्या आधारे अशा हल्ल्याची माहिती मिळवणे खूपच अवघड असते. देशाने या परिस्थितीत एकत्रितरित्या सैन्याच्या मागे उभे राहायला पाहिजे. या हल्ल्याला आपले भारतीय सैन्य निश्चितच चोख उत्तर देईल, अशी भावना निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केली.

जम्मूच्या पुलवामामध्ये अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. या ताफ्यावर अतिरेक्यांनी केलेल्या आईडी स्फोटात 40 जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

यावेळी ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणाले, सीआरपीएफच्या बसचा ताफा ज्या रस्ताने जाणार होता त्याच रस्त्यावर हा आत्मघाती हल्ला झाला. गुप्तहेर माहितीच्या आधारे अशा हल्ल्याची माहिती मिळवणे खूप अवघड असते. पुलवामा हा असा भाग आहे जिथे एक किंवा दोन रस्ते आहेत, त्यामुळे लष्करी वाहन कुठून जाणार हे माहीत असल्याने दहशतवाद्यांना हल्ला करणे सोपे आहे. या परिस्थितीत देशाने सैन्याच्या मागे उभे राहायला पाहिजे. या हल्ल्याला आपले भारतीय सैन्य निश्चितच चोख उत्तर देईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.