Pune : पोलिसांच्या वेशात दागिने लुबाडण्याचा डाव फसला; आरोपीचा हवेत गोळीबार

सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. : The intrigue of stealing jewelery in police uniform failed; Accused shot in the air

एमपीसीन्यूज : पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ येथील बालाजी ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानात पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी लुटमार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सराफ व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला असला तरी आरोपीने जाता जाता हवेत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-सातारा महामार्गावर कापूरहोळ येथे बालाजी ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. आज, गुरुवारी दुपारच्या सुमारास एक व्यक्ती पोलिसांचा वेष परिधान करुन दुकानात आला.

‘तुम्ही चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करता’, असा आरोप करत त्याने सराफ व्यावसायिकाला धमकावले. त्यानंतर दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने एका पिशवीत भरण्यास सांगितले.

दरम्यान, पोलीस असे दागिने भरून घेऊन जात नसल्याचे सराफाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीला प्रति प्रश्न केला. त्यामुळे आरोपी सावध झाला आणि त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

प्रसंगावधान राखत सराफ व्यावसायिकाने त्याला पकडले. मात्र, त्याने हवेत गोळीबार केला आणि पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ज्वेलर्समधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.