Pune : महापालिका सभेचे कामकाज कोरमअभावी थांबवले!

एमपीसी न्यूज – पुणेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या करवाढीच्या विषयाबाबत नगरसेवक किती गंभीर आहेत. याचा प्रत्यय मंगळवारी आला. या विषयावर आयोजित खास सभा सुरू होऊनही अपेक्षित सदस्य संख्या पूर्ण न झाल्याने सुमारे अर्धा तास कामकाज थांबून ठेवावे लागले. दरम्यान, महापालिकेचे कामकाज कोरमअभावी थांबवले!

पाणीपट्टी 15 टक्के आणि मिळकत करत 12 टक्के वाढ करण्यासाठी मंगळवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेला नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने गैरहजर का? आयुक्त येणार की नाही, असा सवाल काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला.

तर, या सभेला कोरम पण नाही, असे विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ म्हणाल्या. विरोधी पक्षनेते यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्या, असे आवाहन शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केला. त्यांनतर रासने सभागृहात आले. दुपारी 3 वाजता ही सभा बोलाविण्यात आली होती. आवश्यक सदस्य संख्या नसल्याने काही काळ सभेचे कामकाज थांबले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.