Pune : समान पाणी पुरवठा योजनेसाठी  मीटर न बसवणाऱ्यांवर महापालिका करणार कायदेशीर कारवाई

एमपीसी न्यूज – समान पाणी पुरवठा योजनेत स्थानिक नागरिक मिटर बसविण्यास विरोध ( Pune) करत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांच्या विरोधात पोलिस कारवाई करण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया सुरु केली आहे.पुणे महापालिकेतर्फे समान पाणी पुरवठा योजनेचे काम 2017 मध्ये सुरु केले. आत्तापर्यंत 62 टक्के काम पूर्ण झालेले आहे.
 
 या योजनेतून सोसायट्या, बंगल्यांमध्ये 3 लाख 18 हजार पाणी मिटर बसविले जाणार आहेत. ज्या भागातील पाणी पुरवठा वितरणाच्या यंत्रणेचे काम पूर्ण झाले आहे. अशा सोसायट्या, बंगल्यांना पाणी मिटर बसविण्याचे काम सुरु असून, आत्तापर्यंत 1 लाख 34 हजार 580 मिटर बसवून झाले आहेत.सध्या मध्यवर्ती पेठा, सहकारनगर, पर्वती, कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, कोथरूड, कर्वेनगर, वारजे आदी या भागात मिटर बसविण्याचे काम सुरु आहे. त्यामध्ये पेठा व सहकारनगर, कात्रज भागात पाणी मिटर बसविण्याच्या कामास स्थानिक राजकीय पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते विरोध करत आहेत.

 
तसेच सोसायट्यांचे पदाधिकारीही विरोध करत आहेत. त्याबाबत पाणी पुरवठा विभागाने समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरीही विरोध कमी झालेला नाही. त्यामुळे त्याबाबत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, ‘‘समान पाणी पुरवठा योजनेचे 40 झोनचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तेथे मिटर बसविणे अशी छोटी कामे शिल्लक आहेत. पण काही नागरिक मिटर बसविण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आम्ही पोलिस तक्रार ( Pune) करणार आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.