Pune: “मुस्लिम’ प्रमुख संघटनाचा डॉ. अमोल कोल्हे आणि पार्थ पवार यांना जाहीर पाठिंबा

एमपीसी न्यूज – मुस्लिम समाजातील सर्व प्रमुख संघटनाचा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार याना जाहीर पाठिंबा देण्यात आला .

कोंढवा येथील वेलकम हॉलमध्ये पुणे शहर जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील विविध सामाजिक संघटनाच्या प्रतिनिधींचा मेळावा पार पडला. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अक्शन कमिटीचे अध्यक्ष जाहिद शेख, खासदार वंदना चव्हाण, नवाब मलिक, मुस्लिम वेल्फेअर कौन्सिलचे जनरल सेक्रेटरी उस्मान हिरोली, अहले सुन्नत वल जमातचे प्रमुख मौलाना अय्युब अश्रफी व मुफ्ती शाहिद आदी मान्यवर उपस्थित होते.

  • जमात ए इस्लाम ए हिंद, जमियत उलेमा ए हिंद, पुणे शहर सीरत कमिटी, मिल्ली कौन्सिल, ऑल इंडिया इमाम कौन्सिल, उलेमा अक्शन कमिटी , महाराष्ट्र अक्शन कमिटी, अहलए सुन्नत वल जमात व शिया युथ फ्रंट आदी सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला.

धर्मनिरपेक्ष विचार व जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवाराना मुस्लिम समाजातील सर्व प्रमुख संघटनानी पाठिंबा दिला आहे, अशी माहिती मुस्लिम वेल्फेअर कौन्सिलचे जनरल सेक्रेटरी उस्मान हिरोली यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.