Pune : गंगाधाम चौकातील ‘त्या’ खुनाचे गूढ उकलले; कौटुंबिक वादातून सख्या भावानेच खून केल्याचे पोलीस तपासात उघड

The mystery of 'that' murder in Gangadham Chowk was solved; The police investigation revealed that the murder was committed by a brother in a family dispute

0

एमपीसीन्यूज : पुण्यातील गंगाधाम चौकातील सुरक्षारक्षकाच्या खुनाचा उलगडा करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. कौटुंबिक कारणातून झालेल्या वादानंतर हा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, खून करणाऱ्या भावाला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

सुरेश खाजप्पा खानेकर (32) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याचा सख्खा भाऊ प्रकाश खाजप्पा खाजेकर (वय 34) याचा शनिवारी पुण्यातील गंगाधाम चौकात खून केला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगाधाम परिसरातील एका शेडमध्ये शनिवारी दुपारी प्रकाश खाजेकर याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला होता. प्रकाश हा दिवसा बिगारी कामे करून रात्री सुरक्षा रक्षकाचे काम करत होता.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता पत्ते खेळण्याच्या वादातून प्रकाशचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. परंतु, अधिक तपास केला असता प्रकाशच्या सख्ख्या भावाचे नाव पुढे आले.

त्यानंतर पोलिसांनी सुरेश खाजेकर त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने प्रकाशचा खून केल्याची कबुली दिली. दोन भावांमधील कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like