Pune : नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरातर्फे आयोजित ‘63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरातर्फे आयोजित ‘63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’त आज नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि लातूरच्या शैलेश शेळके यांच्या कुस्ती खेळविण्यात आली. हि कुस्ती नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने जिकंली असून तो यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ आहे. ही लढत पाहण्यासाठी खासदार आणि महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते.

म्हाळूंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मल्ल आपले सर्वस्व पणाला लावून जोशाने लढले. यात नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने हि कुस्ती जिकंली. ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेला 3-2 अशा गुण फरकाने पराभूत केले. याचबारोबर महाराष्ट्राला यंदा नवा ‘महाराष्ट्र केसरी’ मिळाला आहे.

६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये गादी विभागात हर्षवर्धन सदगीर याने तर, माती विभागातून शैलेश शेळके याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात हे मल्‍ल एकाच तालमीतील म्हणजे काका पवारांचे पठ्ठे मैदानात होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.