Pune : पुणे विभागात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण घटले; बधितांचा आकडा दीड लाखांच्या पुढे

ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 594 इतकी आहे. ; The number of corona-free patients decreased in Pune division; The number of victims is more than one and a half lakh

एमपीसी न्यूज – पुणे विभागात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण घटले आहे. 11 ऑगस्ट रोजीच्या अहवालात बरे झालेल्या रुग्णांची टक्केवारी 69.45 टक्के होती. तर 12 ऑगस्ट रोजी आलेल्या आकडेवारीमध्ये हे प्रमाण घटून 69.16 इतके झाले आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील कोरोना बधितांची संख्या एक लाख 50 हजार 745 एवढी झाली आहे.

त्यातील 1 लाख 4 हजार 250 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 594 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 901 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे.

बुधवारी (दि. 12) रात्री नऊ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 42 हजार 25 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 50 हजार 745 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एका दिवसात एकूण 4 हजार 405 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 997, सातारा जिल्ह्यात 286, सोलापूर जिल्ह्यात 404, सांगली जिल्ह्यात 181 तर कोल्हापूर जिल्ह्यात 537 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 15 हजार 128 रुग्णांपैकी 86 हजार 817 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 692 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 619 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.27 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.41 टक्के आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 6 हजार 225 रुग्णांपैकी 2 हजार 893 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 135 आहे. कोरोनाबाधित एकूण 197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 12 हजार 51 रुग्णांपैकी 7 हजार 858 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 615 आहे. कोरोनाबाधित एकूण 578 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 हजार 83 रुग्णांपैकी 1 हजार 692 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 225 आहे. कोरोनाबाधित एकूण 166 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 12 हजार 258 रुग्णांपैकी 4 हजार 990 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 927 आहे. कोरोनाबाधित एकूण 341 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.