_MPC_DIR_MPU_III

Pune : पुणे विभागात कोरोनाची संख्या सव्वा लाखाच्या घरात; एकूण 1 लाख 20 हजार 597 रुग्ण, 79 हजार 312 जणांना डिस्चार्ज

पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 65.77 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के ; The number of corona in Pune division is around one and a quarter lakh; A total of 1 lakh 20 thousand 597 patients, 79 thousand 312 people discharged

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील कोरोना बाधितांची संख्या सव्वा लाखाच्या घरात गेली आहे. मंगळवारी रात्री पर्यंत हा आकडा एक लाख 20 हजार 597 एवढा होता. त्यातील 79 हजार 312 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 122 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 65.77 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

मंगळवारी (दि. 4) रात्री 9 वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 27 हजार 410 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 20 हजार 597 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 382 ने वाढ झाली आहे.

यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 98, सातारा जिल्ह्यात 160, सोलापूर जिल्ह्यात 251, सांगली जिल्ह्यात 188 तर कोल्हापूर जिल्ह्यात 685 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील 94  हजार 978 बाधीत रुग्ण  असून कोरोना बाधित  66 हजार 640 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26  हजार 153  आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण 2  हजार 185  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.16  टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.30  टक्के इतके आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 4 हजार 549 रुग्ण असून 2 हजार 287 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 121 आहे. कोरोनाबाधित एकूण 141 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील 9 हजार 490 कोरोना बाधीत रुग्ण असून 5 हजार 949 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 23 आहे. कोरोना बाधित एकूण 518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 440 रुग्ण असून 987 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 351 आहे. कोरोना बाधित एकूण 102 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील 8 हजार 140  कोरोना बाधीत रुग्ण असून 3  हजार 449 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4  हजार 474  आहे. कोरोना बाधित एकूण 217  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.