Pune : कात्रजकरांना आमदार म्हणून निवडण्याची संधी -वसंत मोरे

काय बी झाले तरी हडपसरवर मनसेचा झेंडा फडकविणारच नागरिकांचा निर्धार; कोपरा सभाना चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- कात्रजमधील प्रत्येक भाऊ, बहीण आमदार होणार आहे. काय बी झाले तरी आमचा माणूस म्हणून वसंत मोरे यांना आमदार करणारच असल्याचा निर्धार नागरिकांनी केला. या भागात आपण अनेक विकासकामे केली असून, कात्रजकरांना आता आमदार म्हणून निवडण्याची संधी प्राप्त झाली आहे. 21 ऑक्टोबर रोजी रेल्वे इंजिनचे बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन वसंत मोरे यांनी केले.

हडपसर मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचारार्थ श्वेता कॉम्प्लेक्स, कात्रज भाजीमंडई, साईनगर, रुंदावन नगर भागांत कोपरा सभा घेण्यात आल्या. त्यावेळी नागरिकांनी हडपसर मतदारसंघावर मनसेचा झेंडा फडकवून वसंत मोरे यांना आमदार करण्याचा निर्धार केला.

भगवान शिंदे म्हणाले, विधानसभेच्या अनेक निवडणूक झाल्यात. पण, आपल्या भागाला न्याय मिळाला नाही. यावेळी आपल्याला मोठी ताकद लावायची आहे. नगरसेवक झाल्यानंतर मोरे यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली. त्यांना आमदार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर, स्वतः च टार्गेट फिक्स करून जास्तीत जास्त लोकांना मतदानासाठी बाहेर काढावे. आपल्याला झोपणारा नको तर कार्यक्षम आमदार हवाय, असे राजू फरांदे यांनी सांगितले.

महिलांनी आपल्या नात्यातील लोकांना सांगून वसंत मोरे यांना मतदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे भाग्यश्री बालवडकर म्हणाल्या.

आगामी काळात मला कात्रज चौकातील वाहतुकीचा प्रश्न सोडवायचा आहे. सध्या आमचा पक्ष छोटा आहे. त्यामुळे माझी ताकद कमी पडत आहे. 2 नगरसेवक असतानाही भाजपचा 100 नगरसेवकांना आम्ही वाकवतो. या भागात अद्ययावत हॉस्पिटल उभारण्याबरोबरच कात्रज भाजी मंडईचे पुनर्वसन करणार असल्याचे वसंत मोरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.