BNR-HDR-TOP-Mobile

Pune : मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची मूळ संविधान प्रत धर्मादाय आयुक्तालयातून गहाळ

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – शिक्षक हेच पदाधिकारी असणारी पुणे आणि मुंबई येथे ८५ पेक्षा अधिक वर्ष कालावधीपासून शैक्षणिक क्षेत्रात नामांकित असलेली संस्था म्हणून मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचा नावलौकिक आहे. सोसायटीच्या संविधानावर या संस्थेची कार्यप्रणाली सुरु आहे. तीच मूळ संविधान प्रत धर्मादाय आयुक्तालयातून गहाळ झाली आहे. त्यामुळे संबंधित दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करावी, तसेच मूळ संविधात प्रत रेकॉर्डवर घेण्याची मागणी पुणेकर नागरिक कृती समितीने केली आहे.

पुणेकर नागरिक कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री, उच्च न्यायालय, शिक्षण मंत्री आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या मूळ संविधानाची प्रत गहाळ झाल्याचे पुणे धर्मादाय आयुक्तांनी 2016 साली सांगितले आहे. 2016 पर्यंत घटनेची प्रत रेकॉर्डवर होती. त्याप्रमाणे संस्थेचे काम सुरु आहे. या संस्थेची नोंदणी ज्या संविधानाच्या आधारे केलेली आहे, त्याचे नोंदणी प्रमाणपत्र व पावती अस्तित्वात आहे. तसेच संस्थेची घटना अस्तित्वात असल्याचे नमूद करून त्यातील लागू ठरत असलेल्या तरतुदींचा संदर्भ देऊन धर्मादाय आयुक्तांनी चार वेळेला न्यायालयीन आदेश पारित केले आहेत, असे असताना संविधानाची मूळ प्रत गायब होणं ही धक्कादायक बाब आहे.

  • संस्थेचा महत्वच दस्तऐवज गहाळ होणे ही अतिशय गंभीर बाब असून यामुळे संस्थेचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सह धर्मादाय आयुक्त एस. बी. कचरे, त्यांचे सहाय्यक एन. व्ही. जगताप यासाठी कारणीभूत असल्याचे पुणेकर नागरी कृती समितीचे सचिव मिहीर थत्ते यांनी सांगितले. या घटनेत काही राजकीय मंडळींचा हात आहे. त्यामुळे राजकीय मंडळींनी धर्मादाय आयुक्त व कर्मचारी यांना हाताशी धरून संविधानाची मूळ प्रत जाणीवपूर्वक गहाळ केली आहे.

संस्थेचे नित्याचे प्रशासकीय, आर्थिक, शैक्षणिक काम या घटनेच्या आधारे सुरु आहे. संस्थेतील प्रत्येकाच्या भूमिका व कार्ये याबाबत घटनेत सांगण्यात आले आहे. ही व्यावसायिक संस्था नसून सामाजिक संस्था आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने यामध्ये ढवळाढवळ करणे चुकीचे आहे. याबाबत संबंधितांनी योग्य ती कारवाई करावी. संस्थेची मूळ संविधान प्रत रेकॉर्डवर घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.