Pune : पार्थ प्रकरण तात्पुरते, घरात बसून मिटवणे शक्य – राजेश टोपे

एमपीसी न्यूज – पार्थ प्रकरण हे तात्पुरते असून, ते घरात बसून मिटवले जाऊ शकते, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पवार कुटुंब हे आदर्शवत कुटुंब आहे. तर पार्थ पवार हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या कुरुंबातील सध्याचा विषय हा तात्पुरता आहे. पार्थ पवार यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत त्यांच्याशी बोलणे झाल्याचेही टोपे म्हणाले.

आपला देश कायद्यावर चालतो. त्यामुळे आम्हाला कोर्टाच्या निर्णयाचा आदर आहे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी चांगले काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

पुणे शहरात मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, आता ही वाढ खाली येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड वाढवत आहोत. ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये अधिक बील आकारण्यात येत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

तर, पुणेकरांनी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमाचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही टोपे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.