Pune : स्पीकर बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – ही घटना काल सोमवारी (दि.17) रात्री 1 च्या सुमारास खडकी येथील शेवाळे टॉवर्स पाण्याच्या टाकीजवळ घडली.
शैलेश गायकवाड (रा.सुरती मोहल्ला, खडकी), तन्वीर शेख (वय 46, रा.सुरती मोहल्ला, खडकी), आणि सिद्धाराम तिपन्ना येळसंगी (वय 30, रा.दर्गा वसाहत, खडकी) अशी यातील आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी आत्तापर्यंत तन्वीर आणि सिद्धाराम या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी पोलीस उप-निरीक्षक एस.बी.भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी भोसले आपल्या स्टाफसह खडकी येथील शेवाळे टॉवर्स येथील पाण्याच्या टाकीजवळ रात्री उशिरा चालू मोठ्या आवाजात हळदीच्या कार्यक्रमासाठी चालू असणारा स्पीकर बंद करण्यासाठी गेले होते. दरम्यान तेथील तिघांनी फिर्यादी आणि त्यांचा स्टाफला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत मार्शल मोटारसायकलची चावी काढून घेतली. अशाप्रकारे त्यांनी फिर्यादी आणि त्यांचा स्टाफ करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.