Pune : भारती विद्‍यापीठ पोलीस स्‍टेशनमधील लाचखोर पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – पासपोर्टचे व्हेरिफिकेशन करून देण्‍यासाठी तक्रारदाराकडून सुमारे एक हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भारती विद्‍यापीठ पोलीस स्‍टेशनमधील एका पोलीस शिपायास पुणे लाचलुचपत प्रतिबंध (एसीबी) विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. २१) दुपारी दोनच्या सुमारास रंगेहाथ पकडले.

नागनाथ नामदेव भालेराव (हुद्दा – पोलीस शिपाई, नेमणूक :भारती विद्‍यापीठ पोलीस स्‍टेशन,पुणे) असे अटक केलेल्या लाचखोर पोलीस शिपाईचे नाव आहे. याबाबत २७ वर्षीय पुरुषाने पुणे लाचलुचपत प्रतिबंध (एसीबी) विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार यांच्याकडे संशयित आरोपी नागनाथ भालेराव याने पासपोर्टचे व्हेरिफिकेशन करून देण्‍यासाठी सुमारे ३५०० रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंध (एसीबी) विभागाकडे तक्रार दाखल केली.

  • त्यानुसार सहायक पोलीस अधिकारी प्रतिभा शेंडगे, सहायक पोलीस फौजदार उदय ढवणे, पोलीस हवालदार मुश्‍ताक खान, पोलीस नाईक वैभव गोसावी, पोलीस शिपाई अभिजीत राऊत यांनी सापळा रचून पडताळणी केली असता संशयित आरोपी पोलीस शिपाई नागनाथ भालेराव याला भारती विद्‍यापीठ पोलीस स्‍टेशन,पुणे येथे शुक्रवारी (दि. २१) दुपारी दोनच्या सुमारास एक हजार रुपयांची लाच रंगेहाथ पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.