Pune : सराफ व्यावसायिकावर कोयत्याने वार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांनी इन्स्टाग्रामच्या मदतीने घेतला शोध

एमपीसी न्यूज -लष्कर भागात सेंटर स्ट्रीट परिसरात दोघांनी कापड ( Pune) व्यावसायिकावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि.2 ) रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी चक्क इन्स्टाग्रामच्या मदतीने  या प्रकरणातील हल्लेखोराचा शोध घेतला  आहे.

विजय विमलचंद मेहता असे जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी हडपसर येथील युवराज गोरके या संशयिताला अटक केली आहे.

Assembly Election Result : चार राज्यांपैकी तीन राज्यात भाजपने मारली बाजी; आकडेवारीसह अंतिम निकाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहता बंधूंचे सेंटर स्ट्रीटवर मेहता ज्वेलर्स दुकान आहे. दोन हल्लेखोरांनी विजय यांचा पाठलाग केला. विजय स्वत:चा जीव वाचविण्यासाठी ‘स्टेप इन’ कपड्याच्या दुकानात गेले. हल्लेखोरांनी त्या दुकानात शिरून विजय यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिस घटनास्थळी पोचले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले.

पोलिसांना पंचनामा करताना घटनास्थळी आरोपीची चप्पल आढळून आली. पोलिसांनी संशयित आरोपींचे इन्स्टाग्राम अकाउंट तपासले. त्यापैकी एकाच्या पोस्टवर आरोपीच्या पायात तशीच त्याच रंगाची चप्पल असल्याचे दिसून आले. त्यावरून इन्स्टाग्रामच्या मदतीने पोलिसांनी एका आरोपीला अटक ( Pune)  केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.