Pune: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राष्ट्रपतींनी परत बोलवावे, पुण्यात ‘ऑनलाइन’ याचिका दाखल

Pune: The President should recall Governor Bhagat Singh Koshyari, an 'online' petition has been filed in Pune राज्यातील गेल्या सहा महिन्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलाय. या वयात राज्यपाल महोदयांच्या प्रकृतीवर अतिरिक्त ताण येणाऱ्या सर्व घटना आहेत.

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपतींनी परत बोलवावे यासाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमोल देवळेकर यांनी ऑनलाइन पिटिशन दाखल केली आहे. जनतेच्या भावना व्यक्त व्हाव्यात यासाठी ‘चेंज डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावर ही पिटिशन दाखल केली असून त्यावर नागरिकांनी संमती दर्शक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले आहे.

याबाबत डॉ. अमोल देवळेकर यांनी पत्रकाद्वारे भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान आहेत.

राज्यातील गेल्या सहा महिन्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलाय. या वयात राज्यपाल महोदयांच्या प्रकृतीवर अतिरिक्त ताण येणाऱ्या सर्व घटना आहेत. अगदी प्रातःविधी आधी शपथविधी, सारखेच चहापाण्यास येणारी मंडळी हे सगळे प्रकार राज्यपाल महोदयांच्या आरोग्यास घातक आहेत. राज्यपालपदाच्या महानतेला न शोभणारी चिखलफेक मनाला दुःखी करते.

शिवराम हरी राजगुरूंच्या या राज्यात भगतसिंग नाव धारण केलेल्या व्यक्तीची सत्तालोलूप राजकारणाच्या पोटी इतकी अवहेलना नको. हे सगळे तमाम मराठी माणसांना वेदनादायी आहे. तेव्हा लवकरात लवकर त्यांना दिल्लीत सन्मानपूर्वक परत बोलवावे असे त्यांनी आवाहनात नमूद केले आहे.

‘चेंज डॉट ओआरजी’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून ही ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. त्यावर नागरिक संमतीदर्शक प्रतिसाद देत असून आपापली मतेही व्यक्त करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.