Pune : पुणे, पिंपरी-चिंचवडसह मावळमध्येही दिवे लावून दिला ‘गो कोरोना गो..’चा नारा

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवडसह मावळमध्येही नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 9 वाजता 9 मिनिटे दिवे लावून ‘गो कोरोना गो..’ नारा दिला. तर, काही ठिकाणी ‘वंदे मातरम’च्या घोषणाही देण्यात आल्या.

मागील तीन दिवसांत पुण्यात ‘कोरोना’चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या कोरोनाला हरविण्यासाठी पुणेकरांनी घरोघरी दिवे लावून एकतेचा संदेश दिला. काही ठिकाणी ‘गो करोना’च्या घोषणा देऊन फटकेही फोडण्यात आले. सुरुवातीला विजेची उपकरणे बंद करण्यात आली होती.

दारात रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्याला पुणे, पिंपरी-चिंचवडसह मावळमध्येही चांगला प्रतिसाद दिला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.