Pune : अतिवृष्टीमुळे रेल्वे प्रशासनाकडून उद्याच्या अनेक मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे गाड्या रद्द

एमपीसी न्यूज – अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वे प्रशासनाने उद्याच्या (बुधवार, दि.3) काही रेल्वे गाड्या रद्द केल्याचे आज जाहीर केले आहे. यामध्ये मुंबई-पुणे मार्गावरील त्यामुळे (12127/12128) इंटरसिटी एक्सप्रेस, (11010/11009) सिहंगड एक्सप्रेस, (11007/11008) डेक्कन एक्सप्रेस, (12125/12126) प्रगती एक्सप्रेस यांचा समावेश आहे. 

याचबरोबर उद्यापर्यंत (बुधवार, दि.3) (12169/12170) पुणे सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस आणि (51317/51318) पुणे-पनवेल पुणे या देखील रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच उद्या बुधवारी (दि.3) (11025/11026) पुणे-भुसावळ-पुणे हि गाडी दौड-मनमाड मार्गे धावणार आहे.

तर, आज (17614) नांदेड-पनवेल हि गाडी पुणे अंतरापर्यंत धावणार असल्याचेही सांगितले आहे. पुणे-पनवेल या गाड्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द केल्या आहेत, याची प्रवाशांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.