Pune : ‘जेएनयु’मधील हल्ला निषेधार्हच -अरुणा ढेरे

एमपीसी न्यूज – ‘जेएनयु’मधील हल्ला निषेधार्हच आहे. सध्या देशातील अस्वस्थता वाढतच चालली आहे; आणि ती शमवण्याबाबत साहित्यिकांसह सगळेच हतबल आहेत, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

या परिस्थितीसाठी राज्यकर्त्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सगळेच जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे याबाबतीत सगळे सत्ताधारी सारखेच आहेत. कुणा एकाचे नाव घेता येणार नाही. साहित्यिक, विचारवंतांनी यासंदर्भात भूमिका घेऊन संबंधितांचे कान पिळण्याची आवश्यकता आहे. मात्र, हा वर्ग देखील दुफळीने ग्रासला असल्याची खंत अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.