Pune : पुणे विभागात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 71.55 टक्के

ॲक्टीव रुग्ण संख्या 43  हजार 958  इतकी आहे. : The recovery rate in Pune division is 71.55 percent

एमपीसी न्यूज – पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.55 टक्के आहे.  विभागातील 1 लाख 21 हजार 772 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 70 हजार 196 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 43  हजार 958  इतकी आहे.

कोरोनाबाधीत एकुण 4  हजार 466 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

सोमवारी (दि. 17) रात्री 9 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 21 हजार 773  नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1  लाख 70  हजार 196  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3  हजार 117  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 829, सातारा जिल्ह्यात 222, सोलापूर जिल्ह्यात 227, सांगली जिल्ह्यात 258  तर कोल्हापूर जिल्ह्यात 581 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील   कोरोना बाधीत एकूण 1  लाख 27 हजार 26 रुग्णांपैकी 97 हजार 335 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 727 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 964 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.63 टक्के आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 7 हजार 539 रुग्णांपैकी 4 हजार 223 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार  121 आहे. कोरोनाबाधित एकूण 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 829 रुग्णांपैकी 9 हजार 323 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 894 आहे. कोरोनाबाधित एकूण 612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 6  हजार 578 रुग्णांपैकी 3  हजार 295 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  3  हजार  62  आहे. कोरोनाबाधित एकूण  221 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 15  हजार 170  रुग्णांपैकी 7  हजार 596  रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7  हजार 154  आहे. कोरोनाबाधित एकूण 420  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.