Pune : ‘त्या’ तीन लोकसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीला शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात

एमपीसी न्यूज-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (Pune ) पक्षाच्या वतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदार संघाची आढावा बैठकीला सुरुवात झाली आहे.
Talegaon Dabhade : जिल्हास्तरीय विषय शिक्षक कार्यशाळेचे आयोजन
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत.त्यामुळे या बैठकीमध्ये नेमक कोणत्या प्रकारचे निर्णय घेतले जातात हे पाहणे जरुरीचे ठरणार (Pune ) आहे.