Pune : सनसिटी ते प्रयेजा सिटीला जोडणारा रस्ता लवकरच खुला होणार; नगरसेविका मंजुषा नागपुरे यांची माहिती

एमपीसी न्यूज – सनसिटी ते प्रयेजा सिटीला जोडणारा रस्ता लवकरच खुला होणार आहे, अशी माहिती नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी दिली आहे. पुण्यात 25 सप्टेंबर 2019 रोजी अभूतपूर्व असा पाऊस झाला. त्यामुळे पुणे-बेंगलोर हायवे खालील ओढ्याला पूर आल्याने सनसिटी व प्रयेजा सिटीला जोडणारा रस्ता वाहून गेला.

सनसिटी व प्रयेजा सिटीमार्गे वडगाव व धायरीला जोडणारा प्रमुख रस्ता असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. हा रस्ता वाहून गेल्यामुळे या ठिकाणच्या वाहतुकीचा ताण सनसिटी रस्त्यावर येत होता. ही गोष्ट लक्षात येताच नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निदर्शनास वरील मुद्दा आणून दिला. बापट यांनी राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता चिटणीस यांना भेटून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगून त्यांना लवकर एनओसी (NOC) आणि डीमार्केशन देण्याची विनंती केली.

पुणे मनपाकडून या रस्त्याच्या कामाची सुरुवात करता यावी, सर्व गोष्टींची पूर्तता करून युद्धपातळीवर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. येत्या सोमवारपर्यंत पूर्णत्वास जाईल आणि रस्ता पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू होईल, असे मंजुषा नागपुरे यांनी सांगितले.

पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग कार्यकारी अभियंता डोंबे यांनी संयुक्त पाहणी केली. हा स्ता पूर्ण झाल्याने सनसिटी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. नॅशनल हायवेचे अधिकारी, पुणे मनपा यांच्याशी लगेचच साधलेल्या समनवयामुळे आणि खासदार गिरीश बापट व आमदार भीमराव तापकीर यांच्या सहकार्यातून कामाला गती मिळाली, असेही नागपुरे म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.