Pune : समाजाच्या विविध स्तरावर पोहोचण्यात सामाजिक संस्थांची भूमिका महत्वाची – डॉ. विठ्ठल जाधव

कुसुमवत्सल्य फाउंडेशनचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – समाजाच्या सर्व स्तरातील लोकांसाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असते. सुरुवातीच्या काळात सहकाराच्या चळवळीतून समाजाच्या विकासासाठी प्रयत्न झाले. परंतु ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, असे असंख्य वेगवेगळे वर्ग समाजात आहेत. शासन व सहकाराच्या माध्यमातून जी मदत पोहोचणे शक्य होत नाही, तेव्हा सामाजिक संस्थांची मदत घेतली जाते. त्यामुळे समाजाच्या विविध स्तरावर पोहोचण्यात सामाजिक संस्थांची भूमिका महत्वाची असते, असे मत माजी पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी व्यक्त केले.

कुसुम वात्सल्य फाउंडेशनच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण डॉ. विठ्ठल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

  • कार्यक्रमासाठी ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ. दत्ता कोहिनकर, अभिनेते संदिप पाटील, राजाभाऊ कदम, शिरीष मोहिते, शोभा बल्लाळ, दीपा परब, श्रीमती निलोफर, रमाकांत गुंड ,कैलास पठारे पाटील, उज्वला झेंडे, उमेश चाफे, सुषमा खटावकर, सारिका अगज्ञान आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात कमल महाजन यांना महाराष्ट्र आदर्श माता पुरस्कार, कल्पना वरपे, अश्विनी वेताळ पाटील आणि निर्मला पायगुडे यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्‍कार, तर लीना मुडलिक यांना ‘महाराष्ट्र उद्योजिका पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

  • वैशाली पाटील म्हणाल्या, समाजात असे काही लोक आहेत, ज्यांचे समाजाप्रती खूप चांगले काम आहे. परंतु ते कधीही समाजासमोर आले नाहीत. अशा कर्तृत्ववान व्यक्तींची व त्यांच्या कार्याची दखल घेणे हे कुसुम वात्सल्य संस्था आपले कर्तव्य समजते. अनाथ, वंचित, विकलांग मुलांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश वंदना सादर केली. निराधार मुलांनी बनवलेले लाईटचे मोदक गिफ्ट म्हणून पाहुण्यांना देण्यात आले.

यावेळी स्वाती सरडे यांनी सूत्रसंचालन केले. किरण गेहरवार आणि वैशाली पाटील यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.