_MPC_DIR_MPU_III

Pune : ‘क्वारंटाइन सेंटर’मध्ये उपचारासाठी जाणाऱ्या महिलांची सुरक्षा धोक्यात – चित्रा वाघ

The safety of women going for treatment at the quarantine center is in danger - chitraa wagh : कोरोनाचा कहर वाढतोय. त्याच प्रकारे विकृती फोफावली

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकट काळात क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे या महिलांनी या सेंटरवर जायचे की घरीच मरायचे, असा संतप्त सवाल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

_MPC_DIR_MPU_IV

क्वारंटाइन सेंटरमध्ये महिला रुग्णांवर होणारे अन्याय, अत्याचार, महिलांची सुरक्षा, पोलिसांकडून संरक्षणाची अपेक्षा आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे याबाबत चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सरचिटणीस दीपक नागपुरे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा शशिकला मेंगडे उपस्थित होत्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, कोरोनाचा कहर वाढतोय. त्याच प्रकारे विकृती फोफावली आहे. विनयभंग, बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न, अशा चार घटना या पूर्वी घडल्या. त्याचा खुलासा राज्य सरकारने करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

कोरोनाबाधित महिलांवरील अत्याचाराबाबत चंद्रपूर, कोल्हापूर, पनवेल आणि पुण्यातील घटनेचा वाघ यांनी यावेळी उल्लेख केला. त्याआधी वाघ यांनी पुण्यातील सिंहगड कॉलेज मधील क्वारंटाइन सेंटरला भेट दिली.

_MPC_DIR_MPU_II

वाघ पुढे म्हणालया, सध्या कोरोना संकटातही महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना काळात महिलांवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. त्या ठिकाणी पीडित महिला कोरोनावरील उपचार घेण्यासाठी क्वारंटाइन सेंटरमध्ये गेल्या होत्या.

पुण्यातही असा प्रकार घडला. मी त्या मुलीची विचारपूस केली. तिचे दैव बलवत्तर म्हणूनच ती वाचल्याचे तिच्याशी बोलल्यानंतर जाणवले.या घटनांमधील आरोपींना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी वाघ यांनी केली.

क्वारंटाइन सेंटरवर योग्य ती खबरदारी घेणे महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकारी यांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे जिथे महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत त्या क्वारंटाइन सेंटरची जबाबदारी असलेले प्रशासकीय अधिकारी, सुरक्षा अधिकारी यांच्यावर कारवाई का करू नये, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पुण्यातील एका क्वारंटाइन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेचा दरवाजा तेथे असलेला सुरक्षा रक्षक ठोठावत होता. त्यामुळे त्या महिलेने कुटुंबियांना व 100 नंबरला फोन केला. घरच्यांनाही फोन केला. पण, मोबाईलला रेंज मिळत नव्हती.

तिचा पती आयसीयूमध्ये असून तिला छोटी मुलगी आहे. पीपीई किट नसल्याने पोलीस येऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. शासनाने ज्या ज्या ठिकाणी क्वारंटाइन सेंटर आहे. त्या त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा, त्यांना पीपीई किट द्यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.