Pune : ‘त्या’ स्टार्टअपच्या कर्मचार्‍यांनी गरजूंच्या अन्न व्यवस्थेसाठी दिले वेतन

एमपीसी न्यूज – कोरोना या विषाणूंमुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीत रिपोस एनर्जी या डोअर टू डोअर डीझेल डिलिव्हरी स्टार्टअपच्या कर्मचाऱ्यांनी आपला पगार गरजूंच्या अन्न व्यवस्थेसाठी दिला आहे. सरकारच्या एका एनजीओसोबत मिळून गरजूंसाठी काम करण्याचे त्यांनी ठरविले आहे. चेतन वाळुंज आणि अदिती भोसले – वाळुंज यांनी तीन वर्षांआधी सुरु केलेल्या रिपोस एनर्जी या डोअर टू डोअर डीझेल पुरवणाऱ्या स्टार्टअपतर्फे एक नवीन मोहीम ‘लेंड अ हॅन्ड’ सुरु करण्यात आली आहे. कोरोनाच्या या कठीण काळात नागरिकांना मदत करण्यासाठी ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या स्टार्टअपच्या कर्मचाऱ्यांनी आपला एक महीन्याचा पगार कामगार, मजुर आणि इतर गरजूंच्या मदतीसाठी दिला आहे.

कर्मचाऱ्यांकडून 7 लाख रुपये गोळा केले आहेत. तसेच कंपनीतर्फे 2 लाख रुपये या मोहीमेसाठी देण्यात आले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे 900 कुटुंबांना आता पर्यंत याचा लाभ मिळाला आहे. या मदतनिधीच्या माध्यमातून या कुटुंबांना लाॅकडाऊन संपेपर्यंत अन्न व्यवस्था करण्यात येणार आहे. अशी माहिती रिपोस एनर्जीचे संचालक चेतन वाळुंज यांनी दिली. कंपनीचे कार्मचारी नुपूर सिंग यांनी या कामासाठी 50 हजार रुपयांची मदत केली. तर सुमित देशमुख, राकेश द्विवेदी, किरण दळे यांनी सुद्धा या कर्मचाऱ्यांनी सुद्धा मोलाचा हातभार लावला आहे.

कर्मचाऱ्यांकडून इतक्या मोठ्या प्रतिसादाची आम्ही खरच अपेक्षा केली नव्हती. सुरुवातीला आम्ही केवळ या मोहीमेबद्दल कर्मचाऱ्यांना सांगितले. तसेच आम्ही असेही स्पष्ट केले की, कर्मचाऱ्यांच्या वतीने कंपनीतर्फे एक ठराविक रक्कम या कार्यासाठी देण्यात येणार आहे. तरी देखील कुणाला स्वत:हून यामध्ये काही रक्कम जोडायची असेल तर ते देखील या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन जी मदत केली. त्यातून मानवतेचे दर्शन घडते तसेच सगळ्यांच्या एकत्र येण्यामुळे हे शक्य झाले असल्याचे रिपोस एनर्जीचे संचालक चेतन वाळुंज यांनी सांगितले.

आम्ही आमच्या एकही कर्मचाऱ्याला कामावरुन काढले नाही, उलट आम्ही अजून कर्मचाऱ्यांची भरती करत आहोत. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवत आहोत, तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरी बद्दल खात्री देत आहोत.आमची संस्था कामगार आयुक्त कार्यालय आणि आकांक्षा फाउंडेशन तर्फे देण्यात आलेल्या यादीनुसार गरजूंना मदत करत आहे,अशी माहिती अदिती वाळुंज यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.