BNR-HDR-TOP-Mobile

Pune – घरकाम करणा-या महिलेनेच वृद्धेस गुंगीचे औषध देऊन साडेनऊ लाखांचा ऐवज केला लंपास

293
PST-BNR-FTR-ALL
एमपीसी न्यूज – वृद्धेस गुंगीचे औषध देऊन घरकाम करणा-या महिलेनेच घरातील साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.3) दूपारी 12 ते सायंकाळी 7 च्या दरम्यान कॅम्प येथील फिर्यादीच्या घरी घडली आहे.
याप्रकरणी आबान भादा (वय 35, रा. कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आबान यांनी घरकामासाठी एका महिलेला ठेवले होते. त्या महिलेने घरातील आबान यांच्या वयोवृद्ध आईला गुंगीचे औषध दिले आणि घरातील सोन्याचे दागिने आणि 20 हजारांची रोकड असा तब्बल 9 लाख 50 हजारांचा ऐवज चोरी करून नेला. आबान यांच्या आईला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.
.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3