Pune : भाजपने ‘ईडी’ची भीती दाखवल्यामुळेच शिवसेनेचा युतीचा निर्णय – राधाकृष्ण विखे पाटील

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाने अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) भीती दाखविल्यामुळेच शिवसेनेने युतीचा निर्णय घेतला, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी विखे पाटील म्हणाले, एकमेकांची औकात काढणारे हे दोन्ही पक्ष आता एकमेकांच्या गळ्यात हात घालत आहे. झालेली युती ही अभद्र, अनैतिक, असत्य आहे. त्यामुळे जनताच यांना धडा शिकवील्याशिवाय राहणार नाही. राम मंदिरासाठी अयोध्येला गेले तेव्हा, शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय युती करणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्या घोषणेचं आता काय झालं? असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केला.

  • यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अगदी कमी कालावधी शिल्लक राहीला असताना. मागील साडेचार वर्षात शिवसेनाकडून पंतप्रधानवर ‘चौकीदार चोर है’, ‘पहिले मंदिर फिर सरकार’ अशा शब्दात टीका करून देखील शिवसेना पक्षप्रमुख युती करण्यास तयार होतात. यामागे भाजपकडून इडीचा दबाव टाकल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युती करण्यास तयार झाले असावे, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात केला.

यावेळी विखे पाटील म्हणाले की, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना आणि भाजप युती करण्याची आज घोषणा करणार आहे. पण, मागील साडेचार वर्षाच्या काळात शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर चौकीदार खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. तरी देखील भाजप शिवसेनेच्या दारात जाऊन युती करण्यास तयार झाली आहे. यातून भाजप किती सत्तेसाठी किती लाचार झाली. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काय चिरीमिरी घेऊन युती करीत आहे. या बाबत चा खुलासा त्यांनी द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली.

  • जवान शहीद झाले असतानाही मोदी प्रकल्पाच्या उदघाटनमध्ये होते व्यस्त
    विखे पाटील पुढे म्हणाले की, राज्याचे दोन जवान शहीद झाले असताना त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते. तर त्या ठिकाणाहून किमान 200 किलोमीटर अंतरावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे काही प्रकल्पाच्या उदघाटनमध्ये व्यस्त होते. मात्र, त्यांनी शहिदांच्या घरी गेले नाही. ही शोकांतिका असून भाजपने अशावेळी देखील पक्षाचा अजेंडा राबविण्याचे काम केले आहे, अशा शब्दात भाजपवर निशाणा साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.