Pune : शहरातील मार्केट यार्डामधील गूळ, भुसार विभाग चालू राहणार -पोपटलाल ओस्तवाल

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ मुळे पुणे महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणे सील करण्यात आली आहेत.मात्र, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मार्केट यार्ड येथील गूळ, भुसारविभाग सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळात चालू राहील, असे दी पूना मर्चंट चेंबर्सचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी कळविले आहे.

या विषयीच्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, बाजारात सर्व प्रकारचा माल उपलब्ध आहे. होलसेल व्यापाऱ्यांकडून कोणतीही भाववाढ करण्यात आलेली नाही. मात्र, वाहतूक करताना परतीचे भाडे दुप्पट द्यावे लागत असल्याने काही वस्तूंच्या किमतीत फरक पडू शकतो.

कोरोनाचे रुग्ण वाढल्याने गुलटेकडी आणि परिसर सील करण्यात आला आहे. मात्र, व्यवहारांसाठी ठराविक काळात तो खुला ठेवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.