Pune – कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाच्या जागेचा ताबा राज्यसरकारकडे

एमपीसी न्यूज – कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाच्या जागेचा ताबा राज्यसरकारकडे 12 जानेवारीपर्यंत देण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.

दरवर्षी 30 डिसेंबर पासून कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने देशातील विविध भागातून नागरिक येत असतात. नेहमी शांततेत पार पडणा-या या महत्त्वाच्या दिवसाला मागील वर्षी मात्र गालबोट लागले होते. कोरेगाव भीमा परिसरात घडलेल्या दंगलीने संपूर्ण राज्यभरात त्याचे गंभीर पडसाद उमटले होते. त्या पार्श्वभूमीवर या वर्षी प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आलेली आहे. विजयस्तंभाच्या परिसराच्या जागेचा ताबा मिळण्याबाबत अर्ज पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हायकोर्टात दिला होता. या अर्जाला मान्यता देत न्या. बी.पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने ही जागा राज्य सरकारकडे सोपवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.