Pune : स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाच्या खर्चाचा तिढा राज्य सरकारकडे

एमपीसी न्यूज – स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रो मार्ग भुयारी होण्याची शक्यता आहे. मात्र, भुयारी मार्गाला 3 हजार 600 कोटी तर एलिव्हटेड मार्गाला 1 हजार 600 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे त्याचा निर्णय राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने घ्यावा, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले, ”या मार्गाबाबत दोन ते तीन पर्याय होते त्यातला भुयारी मार्गाचा पर्याय अंतिम झाला नसला तरी निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी येणारा खर्च कसा उभा करायचा? यावर अभ्यास सुरू आहे. केद्र सरकार राज्य सरकार महापालिका आणि कर्ज असे काही पर्याय आहेत”

  • भुयारी मार्गाचा खर्च 3 हजार 600 कोटी आणि उन्नत मार्गाचा 1 हजार 600 कोटी आहे. केंद्र सरकार 50 टक्के, राज्य सरकार 30 टक्के व महापालिका 20 टक्के अशी विभागणी होती, मात्र राज्य सरकारने काहीही हिस्सा देणार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेने खर्च द्यावा अशी विचारणा केली आहे. दरवर्षी काही रक्कम देण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. मात्र, अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही, असे दीक्षित यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.